जाणून घ्या अंतराळवीरांसंबंधी काही रोचक गोष्टी

अंतराळ पुर्वीपासून मनुष्यासाठी रहस्यांचा खजिना आहे. वैज्ञानिक जेवढे त्याचे रहस्य समोर आणतात, तेवढे ते रहस्य अधिक गूढ होत जाते. आश्चर्यांनी भरलेल्या अंतराळाविषयी अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत ही रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक देशांनी आतापर्यंत अंतराळवीरांना अंतराळात पाठवले. अंतराळवीरांविषयी अशाच काही रोचक गोष्टी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

काही दिवसांपुर्वीच माहिती समोर आली होती की गगनयान मिशनवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांना मिशन दरम्यान मटन आणि चिकन हवे आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कल्पना चावला या शाकाहारी होत्या.

Image Credited – Amarujala

वर्ष 1969 ला अपोलो मिशन दरम्यान चंद्रावर ऑरेंज प्लेवर असणारे एक ड्रिंक नेण्यात आले होते. हे पहिलेच असे मिशन होते, जेव्हा मानवाने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल टाकले होते.

Image Credited – Amarujala

रशियाच्या वलेंटिना तेरेशकोव्हा पहिल्या महिला अंतराळवीर होत्या. त्यांनी मॉक्सो येथून अंतराळयान वोस्टोक 6 मधून आपला प्रवास सुरू केला होता.

Image Credited – Amarujala

जॉन ग्लेन अंतराळात जाणारे आतापर्यंतचे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत. अंतराळात गेले त्यावेळी त्यांचे वय 77 वर्ष होते. तीन वेळा पृथ्वीची परिक्रमा करणारे ग्लेन हे अंतराळात जाणारे तिसरे अमेरिकन होते.

Image Credited – Amarujala

भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स पहिल्या महिला होत्या, ज्या 188 दिवस अंतराळात होत्या. त्या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत.

Leave a Comment