ह्युंडाईची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही देणार तब्बल 484 किमी मायलेज

सध्या भारतात अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे. ह्युंडाईने देखील भारतात ह्युंडाई कोना इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली होती. आता ही इलेक्ट्रिक कार आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक ड्राईव्ह रेंज देणार आहे. आधी ही कार फुल चार्जिंगमध्ये 449 किमी अंतर पार करत असे. मात्र आता याचे ड्राइव्ह रेंज वाढवून 484 किमी करण्यात आले आहे. हे मॉडेल यूरोरियन बाजारात सादर केले जाईल. मात्र, 64 kWh बॅटरी पॅक आणि 204 hp इलेक्ट्रिक मोटर असलेल्या टॉप व्हेरिएंटमध्येच या वाढलेल्या रेंजचा फायदा मिळेल.

भारतात विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर कोना ईव्हीमध्ये 39.2 kWh बॅटरी पॅक मिळतो, जे 136 hp च्या इलेक्ट्रिक मोटरला चालवते. भारतात उपलब्ध मॉडेल फुल चार्जिंगमध्ये 452 किमी अंतर पार करू शकते.

Image Credited – Amarujala

लिथियम आयन पॉलिमर बॅटरीला एसी चार्जरद्वारे जवळपास 6 तास आणि 10 मिनिटात फूल चार्ज करता येते. तर डीसी फास्ट चार्जरद्वारे केवळ 57 मिनिटात बॅटरी 80 टक्के चार्ज होईल. कंपनीचा दावा आहे की ही कार केवळ 9.7 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडू शकते.

Image Credited – Amarujala

ह्युंडाईची चेक रिपब्लिक फॅक्ट्री यूरोपियन बाजारासाठी कारची निर्मिती करेल. या फॅक्ट्रीची वर्षाला 30 हजार यूनिट्सची निर्मिती करण्याची क्षमता आहे. कंपनीचे लक्ष्य 80 हजार यूनिट्सचे आहे.

सध्या भारतीय बाजारातील इलेक्ट्रिक कोनाची किंमत 23.71 लाख रुपये आहे. मात्र 1 एप्रिलनंतर कस्टम ड्युटीमुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment