BS-6 इंजिनसह या आहेत 5 शानदार बाईक्स

दूचाकी कंपन्या आता बीएस6 मानक इंजिनसह बाजारात बाईक लाँच करत आहेत. होंडा, टिव्हीएस, यमाहा सारख्या कंपन्यांनी बीएस6 150 सीसी सेगमेंटमध्ये शानदार बाईक लाँच केल्या आहेत. अशाच काही पॉवरफुल आणि स्टायलिश बाईकविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

होंडा यूनिकॉर्न –

नवीन होंडा यूनिकॉर्नमध्ये BS6 कंप्लाइंट 162.7 सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन फ्यूल इंजेक्शन आणि होंडा ईको टेक्नोलॉजी (HET) सोबत हेते. यूनिकॉर्नचे इंजिन 7500 आरपीएमवर 12.73 bhp पॉवर आणि 5000 आरपीएमवर 14 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 93,593 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 –

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 मध्ये BS6 इंजिन 159.7सीसी सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 2-वॉल्व, एअर-कूल्ड SI इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8400 आरपीएमवर 15.53 PS पॉवर आणि 7000 आरपीएमवर 13.9 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते. टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ची एक्स शोरूम किंमत 98,000 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4व्ही –

या बाईकमध्ये देखील बीएस6 159.7cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 4-वॉल्व, ऑयल-कूल्ड SI इंजिन मिळेल. हे इंजिन 8250 आरपीएमवर 16.02 PS पॉवर आणि 7250 आरपीएमवर 14.12Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते. या बाईकच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 1,00,950 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

यमाहा एफझेडएस-एफआय –

यमाहा एफझेडएस-एफआयमध्ये BS6 मानक 149 सीसी, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 2-वॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7250 आरपीएमवर 12.4 PS पॉवर आणि 5500 आरपीएमवर 13.6 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे.

Image Credited – Amarujala

सुझुकी जिक्सर –

या बाईकमध्ये बीएस6 कंप्लाइंट 155सीसी 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, एफआय, SOHC इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 13.6 ps मॅक्सिमम पॉवर आणि 6000 आरपीएमवर 13.8Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. या बाईकची किंमत 1.11 लाख रुपये आहे.

Leave a Comment