एकेकाळी खायचे वांदे असणार व्यक्ती दररोज उडवतो ६४ लाख रुपये


प्रत्येकाला श्रीमंतांच्या जीवनशैलीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. ते पैसे कसे खर्च करतात? ते आपले जीवन कसे जगतात? अशा सर्व गोष्टी ज्या त्यांना सर्वात अद्वितीय बनवतात. काही लोक खूप शो-ऑफ करतात, काही जण आपले जीवन अतिशय वैयक्तिक ठेवतात. असाच एक जर्मन अब्जाधीश आहे जो आपले जीवन मुक्तपणे जगत आहे आणि ते फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो दररोज पार्टी करतो आणि दररोज ६४ लाख रुपये खर्च करतो. ४० वर्षीय बसशियन योटाला आपले जीवन मुक्तपणे जगणे पसंत आहे.

next sharkने दिलेल्या वृत्तानुसार बसशियन म्हणतो कि, मी जे स्वप्न पाहिले होते ते खरे झाले आहे. माझ्याकडे स्वतःचे बेवॉच आहे आणि त्यात अभिनेत्री पामेला अँडरसनसारख्या सुंदर मुली देखील आहेत. सोशल मीडियावर बसशियन खूप सक्रिय असतो. त्याने आपले जुने आणि नवीन फोटो टाकून स्वतःची कथा लिहिली- काही वर्षांपूर्वी मी खूपच गरीब, आणि जाडजूड होतो. माझे जीवन माझे शत्रू होते. पण एक दिवस मी निर्णय घेतला कि मी माझ्या मर्जीनुसार जीवन जगू असे ठरविले. माझ्यासाठी खूप अवघड होते. पण यात मी अयशस्वी होईल अशी देखील भीती मला वाटत होती. पण मी पुढे गेलो आणि मी माझ्या यशाला गवसणी घातली.

बसशियन एका सौंदर्य आणि सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आहे. याशिवाय, त्यांचे उत्पन्न गिबॅकोन आहे. हे सॉफ्टवेअर प्रदाता ऑडिओ आणि व्हिज्युअलच्या मदतीने लोकांना एकमेकांशी कनेक्ट ठेवतात. लोक आपल्याबद्दल काय विचार करीत आहेत याची मला पर्वा नाही. आपण स्वत: साठी काय विचार करत आहात हे आवश्यक असल्याचे बसशियन आपल्या यशस्वीतेचा मंत्र असल्याचे म्हणतो.

डेली मेलच्या वृत्तानुसार, जर्मनीतील म्युनिच येथे बसशियन आपली पत्नी मारियासोबत राहत होता. जिथे तो दररोज घरात पार्टी करायचा. त्यांच्याकडे एक फेरारी कारही होती आणि त्यानुसार लोक त्याची जीवनशैली बघून जळू लागले. त्यामुळे त्याने देश सोडून दिला आणि लॉस एंजिलिसमध्ये रहायला लागला. तो म्हणतो, जर्मनीतील लोक माझ्या कारवर थुंकत होते. माझ्या जीवनशैलीमुळे जळत होते. बेव्हरली हिल्समध्ये आता एक १० बेडरुमचा माझा आलिशान बंगला आहे. तो येथे नेहमी पार्टी करतो. त्यांच्याजवळ अनेक महाग स्पोर्ट्सकारही आहेत.

Leave a Comment