100 वर्षांपुर्वी पसरला होता कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर आजार

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यामुळे आतापर्यंत शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र 100 वर्षांपुर्वी यापेक्षा भयंकर आजार पसरला होता. याला ‘स्पॅनिश फ्लू’ नावाने ओळखले जाते. फ्रान्सच्या सीमेजवळील खंदकांमधील घाणीमुळे सैन्य प्रशिक्षण शिविरात या आजाराची सुरूवात झाली.

प्रथम युद्ध समाप्त झाल्यानंतर घरी परतणाऱ्या संक्रमित सैनिकांसह हा आजार देखील सर्वत्र पसरला. स्पॅनिश फ्लूमुळे जवळपास 5 ते 10 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता, असे सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

स्पॅनिश फ्लूच्या तुलनेत कोव्हिड-19 द्वारे मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी आहे. स्पॅनिश फ्लू जेव्हा पसरला, त्याकाळी नुकताच विमान प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे त्या काळात हा आजार इतर भागात पसरला नाही. त्यावेळी हा आजार केवळ रेल्वे आणि बोटीतून प्रवास करणाऱ्यांद्वारेच खूप कमी प्रमाणात पसरला.  त्यावेळी देखील लोकांनी शाळा बंद ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी जमा न होणे आणि गावापर्यंत पोहण्याचे रस्ते बंद करण्यासारखे उपाय केले.

Image Credited – Amarujala

डॉक्टर स्पॅनिश फ्लूला इतिहासातील सर्वात मोठा जनसंहार मानतात. यामुळे अनेक तरूण आणिन निरोगी लोकांचा मृत्यू झाला. या आजारामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट होते. यामुळे सायटोकीन स्टॉर्म नावाची प्रतिक्रिया होतेव फुफ्फुसांमध्ये पाण्याने भरले जाते, ज्यामुळे हा आजार इतरांपर्यंत पसरतो. स्पॅनिश फ्लू प्रथम विश्वयुद्धा दरम्यान पसरला होता. त्यावेळी सर्वसंसाधन सैन्य कार्यात वापरले जात होते व सार्वजनिक आरोग्य प्रणालीची कल्पना देखील विकसित नव्हती.

Image Credited – Amarujala

स्पॅनिश फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या अधिकांश लोकांमध्ये झोपडी अथवा शहर व गरीब भागात राहणारे लोकच होते. जेथे स्वच्छता आणि पोषक आहाराची कमी होती.

Leave a Comment