1 एप्रिलपासून पॅन, आयकर, जीएसटीचे हे नियम बदलणार

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून पॅन, आयकर आणि जीएसटीशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून नवीन टॅक्स स्लॅबची सुरूवात होईल, सोबतच जुन्या टॅक्सचा पर्याय सुद्धा करदात्यांसाठी आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासंबंधी नवीन नियम देखील 1 एप्रिल 2020 पासून लागू होतील.

पॅन-आधार लिंक –

आयकर विभागाने पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 दिली आहे. या तारखेपर्यंत लिंक न केल्यास पॅन ‘Invalid’ होईल. या दरम्यान पॅन कार्ड सुरू राहिल, मात्र त्याचा वापर करण्यासाठी 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

नवीन इनकम टॅक्स सिस्टम –

केंद्र सरकारने बजेट दरम्यान नवीन इनकम टॅक्स सिस्टमची घोषणा केली होती. नवीन व्यवस्थेनुसार, कोणतीही सुट अथवा कपात होणार नाही. मात्र कर भरणारे जुन्या प्रणालीची देखील निवड करू शकतात.

जीएसटी रिटर्नचा नवीन नियम –

जीएसटीची नवीन प्रणाली देखील या नवीन आर्थिक वर्षात लागू होईल. या नवीन प्रणालीमुळे जीएसटी रिटर्न्स भरणे सोपे होईल. नवीन प्रणाली अंतर्गत GST FORM ANX-1 आणि GST FORM ANX-2 नावाने दोन फॉर्म ठेवण्यात आलेले आहेत.

बीएस-4 इंजिन असणाऱ्या वाहनांची विक्री बंद –

1 एप्रिल 2020 पासून देशात केवळ बीएस-6 मानक इंजिन असणाऱ्या वाहनांचीच विक्री होईल. ऑक्टोंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Comment