बेंटलेच्या या कारमध्ये वापरण्यात आले आहे तब्बल 5 हजार वर्ष जुने लाकूड

ब्रिटिश लग्झरी कार कंपनी बेंटलेने आपली नवीन कार म्यूलिनर बाकलरला ऑनलाईन लाँच केले आहे. कारच्या आतील डिझाईनसाठी 5 हजार वर्षांपुर्वी पडलेल्या झाडांच्या लाकडाचा वापर केला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Image Credited – marketwatch

कंपनीच्या रुफलेस कारची किंमत 14 कोटी रुपये असून, या कारचे केवळ 12 मॉडेल बनवणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनी या मॉडेलला जिनिव्हा मोटार शो मध्ये लाँच करणार होती. मात्र कोरोना व्हायरसामुळे ऑटो शो रद्द झाल्याने बेंटलेने या लग्झरी कारला ऑनलाईन लाँच केले.

Image Credited – marketwatch

या लग्झरी कारमध्ये 650 हॉर्सपॉवर 12 सिलेंडर इंजिन दिले असून, हे इंजिन 8-स्पीड ट्रांसमिशनसोबत येते. या कारचा टॉप स्पीड ताशी 320 किमी असून, ही कार अवघ्या 3.5 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. या कारची डिलिव्हरी पुढील वर्षी सुरू होईल.

Leave a Comment