एवढ्या संपत्तीची मालकिन आहे श्लोका आकाश अंबानी!


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीसोबत गेल्या वर्षी याच दिवशी श्लोका मेहता विवाहबद्ध झाली होती. बॉलिवूड सेलेब्सशिवाय देशभरातील बड्या राजकारण्यांनीही या लग्नात आवर्जून हजेरी लावली होती. रिलायन्सची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा संपूर्ण कारभार आकाश अंबानी हा सांभाळतो. तर हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांची त्याची पत्नी श्लोका मेहता ही धाकटी मुलगी आहे. देशातील सर्वात मोठी डायमंड कंपनी रोझी ब्ल्यू इंडियाचे रसेल मेहता हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

देशातील लोकांना अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबाबत माहिती आहे. पण आम्ही आज तुम्हाला त्यांची सून श्लोका मेहता हिच्याबद्दल खास माहिती देणार आहोत. अंबानी कुटुंबाची सून श्लोकाची कमाई माहित पडल्यास तुम्हाला देखील भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार २०१४ मध्ये रोझी ब्ल्यू ग्रुपचा एक भाग असलेल्या रोझी ब्ल्यू फाउंडेशनच्या संचालकपदी श्लोकाची नियुक्ती करण्यात आली होती.

त्याचबरोबर कनेक्ट फॉर या संस्थेची श्लोका सह-संस्थापक देखील आहे. बिगर सरकारी संस्था (स्वयंसेवी संस्था) यांना ही संस्था मदत करते. फिनअॅपच्या २०१८ च्या अहवालानुसार, श्लोका मेहता हिची एकूण संपत्ती १८० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी असून जवळपास ७ कोटी एवढे श्लोकाचे वार्षिक उत्पन्न आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अंबानी कुटुंबीयांप्रमाणेच सून श्लोका हिचे शौकही खूप महागडे आहेत. लक्झरी कार श्लोकाला खूप आवडतात. तिच्याकडे मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ आणि बेंटले यासारख्या प्रचंड महागड्या कार आहेत. श्लोकाने २०१८ मध्ये नवीन बेंटले कार खरेदी केली होती. ज्याची किंमत तब्बल ४ कोटी आहे. आता अंबानी कुटुंबीयांसोबत त्यांच्या सूनेच्या देखील संपत्तीबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पण असे असले तरी देखील कुठेही आपल्या श्रीमंतीचा श्लोका गवगवा करत नाही.

Leave a Comment