ह्युंडाई लाँच करणार दोन हत्तींचे वजन उचलण्यास सक्षम असलेली एसयूव्ही

ऑटोमोबाईल कंपनी ह्युंडाई मोटर भारतीय बाजारात आपली ऑल न्यू 2020 ह्युंडाई क्रेटा सेकेंड जनरेशन एसयूव्ही लाँच करणार आहे. 17 मार्चपासून या एसयूव्हीची विक्री सुरू होईल.

नवीन क्रेटा एसयूव्हीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील सुपरस्ट्रक्चर मोनोकॉक आहे. ह्युंडाईने दावा केला आहे की, नवीन एसयूव्ही एवढी ताकदवर आहे की दोन मोठ्या आफ्रिकी हत्तींचे वजन (जवळपास 5,400 किलो) उचलण्यास सक्षम आहे.  नवीन ह्युंडाई क्रेटाचे सुपरस्ट्रक्चर 74.3 टक्के आधुनिक उच्च शक्तीच्या स्टीलद्वारे बनलेले आहे. कंपनीचे अन्य मॉडेल एलेंट्रामध्ये देखील या सुपरस्ट्रक्चरचा वापर करण्यात आलेला आहे.

Image Credited – Amarujala

या एसयूव्हीच्या चेसिसचे वजन केवळ 300 किलो आहे. एसयूव्ही एनसीएपी सुरक्षा क्रॅश टेस्टमध्ये चांगले प्रदर्शन करण्याची आशा आहे. एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये एबीएस, ईबीडी, ईएसपी, ड्युअल फ्रंट एअरबॅग, ISOFIX चाइल्ड सीट एंकरेज, स्पीड-सेंसिंग डोर लॉक, इफेक्ट-सेंसिंग डोर अनलॉक, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर आणि हाय-स्पीड वॉर्निंग बजर मिळेल.

सेकेंड जनरेशन ह्युंडाई क्रेटाच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 3.5 इंच मोनो टीएफटी मल्टी इंफॉर्मेशन डिस्प्ले, 7 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, 17 इंच डायमंड कट एलॉय व्हिल्स, ऑटो होल्ड फंक्शन असणारे इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 6 एअरबॅग्स सारखे फीचर्स क्रेटाच्या टॉप एंड SX(O) मॉडेलमध्ये मिळतील. याशिवाय ड्यूल फ्रंट एअरबॅग्स, ABS सोबत EBD, हाइट एडजस्टेबल ड्राइवर सीट, रिमोट लॉकिंग, प्रॉजेक्टर हेडलँप्स, पॉवर एडजस्टेबल ORVMs, रिअर एसी वेंट्स, लेन चेंज इंडिकेटर, ब्लॅक रेडियेटर ग्रिल, ड्यूल-टोन बंपर, सिल्वर B-C पिलर गार्निश मिळेल. D-कट स्टेअरिंग सोबत टिल्ट

Image Credited – Amarujala

एडजस्टमेंट, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड सेंसिंग डोर लॉक्स आणि हाई स्पीड अलर्टसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
ह्युंडाई क्रेटामध्ये बीएस6 मानक इंजिन मिळेल. यात 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन पर्याय मिळेल. ह्युंडाई क्रेटा ई, ईएक्स, एस, एसएक्स आणि एसएक्स (ओ) या व्हेरिएंटमध्ये मिळेल.

6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येणारे पेट्रोल इंजिन 16.8 किमी प्रती लीटर मायलेज देईल. 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमेटिक गिअरबॉक्ससोबत येणाऱ्या टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील एवढेच मायलेज देईल. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येणाऱ्या डिझेल इंजिन 21.4 किमी प्रती लीटर मायलेज देईल.

Image Credited – Amarujala

पॉवरबद्दल सांगायचे तर 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 140 Bhp पॉवर आणि 242 Nm टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 115 Bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते.
कंपनीने या एसयूव्ही बुकिंग केवळ 25 हजार रुपयांमध्ये सुरू देखील केले आहे. 17 मार्चला ही एसयूव्ही लाँच होईल. सेकेंड जनरेशन ह्युंडाई क्रेटा एसयूव्हीची किंमत 10 ते 16 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment