कोरोनामुळे नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द


नवी दिल्ली – चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पार्श्वभूमीवर आपला नियोजित बांगलादेश दौरा रद्द केला आहे.

शेख मुजीबुर रहमान यांचा जयंती शताब्दी कार्यक्रम बांगलादेशामध्ये होणार होता. १७ मार्च रोजी पंतप्रधान ढाका येथे शताब्दी कार्यक्रमासाठी जाणार होते. पण कोरोना व्हायरसमुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तत्पूर्वी मोदींनी कोरोनामुळे ब्रुसेल्स दौरा रद्द केला होता. ‘फादर ऑफ बांगलादेश’ असे शेख मुजीबुर यांना म्हटले जाते. कमाल अब्दुल चौधरी यांनी शेख मुजीबुर रहमान यांचा जयंती शताब्दी कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे मोदी प्रमुख पाहूणे होते.

Leave a Comment