स्मार्टफोनचा रंग आणि पाण्यापासून असा करा बचाव

होळी आणि धुलवडीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने रंगांसोबत खेळताना शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच रंग आणि पाण्यापासून तुमच्या स्मार्टफोनचा बचाव करणे देखील गरजेचे आहे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. रंगांचा सण साजरा करताना स्मार्टफोनची काळजी कशी घ्याल, याविषयी काही टिप्स जाणून घेऊया.

Image Credited – mensxp

ब्लूटूथ एअरफोनचा वापर करा –

जर तुम्ही घराच्या आजुबाजूलाच होळीच्या वेळी असाल, तर ब्लूटूथ एअरफोनचा वापर करा. यामुळे तुम्हाला वारंवार फोन बाहेर काढावा लागणार नाही.

Image Credited – Amarujala

फोनच्या उघड्या भागांना लावा टेप –

तुमच्या फोनच्या सर्व उघड्या भागांना टेप लावून झाकून टाका. जसे की, मायक्रो यूएसबी पोर्ट, माइक, चार्जिंग प्वॉइंट, एअरफोन प्वाइंट या भागांना टेप लावून झाकून टाकावे.

Image Credited – Amarujala

फोन सुकविण्यासाठी तांदळाचा करा वापर –

जर तुमच्या फोनमध्ये पाणी गेले असल्यास, फोनला तांदळामध्ये काही तासांसाठी ठेवा. फोन तांदळात ठेवण्याआधी त्यातील सीम कार्ड व इतर गोष्टी काढून घ्याव्यात. तांदळात फोन ठेवल्याने त्यातील पाणी शोषले जाते. फोनमध्ये पाणी गेल्यास त्याला सुकविल्याशिवाय चालू केल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते.

Image Credited – Amarujala

फोनला लेमिनेट करा –

फोनला पाण्यापासून वाचविण्यासाठी त्याला लेमिनेट करा. यामुळे फोनचा लूक थोडा खराब दिसेल, मात्र तुमचा फोन पाण्यापासून वाचेल.

Image Credited – Amarujala

लिक्विड प्रोटेक्शन कव्हरचा करा वापर –

बाजारत स्मार्टफोनसाठी लिक्विड प्रोटेक्शन उपलब्ध आहे. याचा वापर तुम्ही फोनच्या सुरक्षेसाठी करू शकता. जर तुम्हाला कव्हर खरेदी करायचा नसेल, तर तुम्ही फोन प्लास्टिकच्या पाउचमध्ये देखील ठेऊ शकता.

Leave a Comment