होळीच्या निमित्ताने फेसबुकही रंगले विविध रंगात

देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम असला तरी देखील अनेक ठिकाणी उत्साहात सण साजरा केला जात आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक देखील या सणाच्या निमित्ताने रंगीबेरंगी रंगात बुडून गेले आहे. फेसबुकने आपल्या युजर्ससाठी खास रंगीबेरंगी फीचर सादर केले आहे. हॅप्पी होळी नावाच्या या फीचरद्वारे युजर्स फेसबुकवर होळीचा आनंद घेऊ शकतात.

या फीचरमध्ये जर तुम्ही कोणाला शुभेच्छा देण्यासाठी Happy Holi लिहिले तर एक लिंक एक्टिव्हेट होते. यानंतर तुम्ही हॅप्पी होळीवर क्लिक करताच तुमच्या फेसबुक वॉलवर रंगीबेरंगी रंगाचा वर्षाव होतो व सोबतच संगीत देखील वाजू लागते.

युजर्सला हे स्पेशल फीचर खूपच आवडत असून, ते एकमेंकाना Happy Holi लिहून शुभेच्छा देत आहेत. हॅप्पी होळीवर क्लिक करताच फेसबुक वॉल पिवळा, हिरवा, लाल, निळा आणि गुलाबी या रंगांनी भरून जात आहे.

Leave a Comment