कपडे कधी धुतले होते समजण्यासाठी कपड्यांमध्ये लावता येणार मायक्रो चीप


घर अथवा हॉटेलमधील बेडशीट, टॉवेल आणि गाद्या कधी धुतल्या होत्या हे आता लक्षात ठेवण्याची गरज नाही. चीनच्या वुहान शहरात एका लॉन्ड्रीने कपड्यामध्ये लावण्यासाठी मायक्रो चीप तयार केली आहे. ज्यामुळे शेवटचे कपडे कधी धुतले होते ते लक्षात ठेवण्याची गरज नाही.  लॉन्ड्रीला आता माहित असते की, शेवटच्या वेळेस बेडशीट कधी धुतली होती. शीट बरोबरच आयटेक मायक्रो चीप सिस्टम टॉवेल आणि गाद्यांमध्ये देखील लावले जात आहेत. ही लॉन्ड्री शहरातील अनेक हॉटेल आणि हॉस्टेलमध्ये सेवा पुरवतात.

चीप बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, बेडशीट, टॉवेल इत्यादींच्या कॉर्नरमध्ये लावण्यात आलेल्या चीपच्या क्यूआर कोडला मोबाईलमध्ये स्कॅन केले जाते. त्यानंतर सर्व माहिती मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. चिप वॉटर प्रुफ आहे. त्याचबरोबर अधिक तापमानात देखील चालते. कितीही धुलाई केल्यानंतर देखील चीपला काहीही होणार नाही.

मध्य चीनच्या वुहान शहराची लोकसंख्या एक करोड पेक्षा अधिक आहे. याचबरोबर हे एक ऐतिहासिक पर्यटनस स्थळ देखील आहे. त्यामुळे संपुर्ण चीनमध्ये हे शहर ट्रांसपोर्टेशन हब देखील आहे.

मागील वर्षी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल समुहाने चीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंट असणाऱ्या हॉटेलच्या स्मार्ट रूम्सला इंटरनेटवर सर्च करण्यासाठी बैदू बरोबर काम केले होते. तेव्हा 100 स्मार्ट सुइट्सची माहिती मिळाली होती. बैदू ही चीनमधील आर्टिफिशियल इंटेलिजेंटसाठी चर्चित कंपनी आहे.

Leave a Comment