1 अब्ज अँड्राईड स्मार्टफोनला हॅकिंगचा धोका

जगभरातील जवळपास 1 अब्जपेक्षा अधिक अँड्राईड युजर्स डाटा प्रायव्हेसी आणि हॅकिंग सारख्या धोक्याचा सामना करत असल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या सर्व स्मार्टफोनसाठी लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट आणि बिल्ट इन प्रोटेक्शन जारी करण्यात आलेले नाहीत. एका कंज्यूमर फर्मने गुगल डाटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार, जगभरातील प्रत्येकी 5 पैकी 2 अँड्राईड यूजर्सला लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट मिळालेले नाही. यामुळे डाटा चोरी आणि हॅकिंगचा धोका वाढतो.

गुगलने मागील महिन्यात अँड्राईड 10 साठी नवीन सिक्युरिटी पॅच रोल आउट केले होते. गुगल अँड्राईड 9 पाय आणि अँड्राईड 8 ओरेओसाठी दर महिन्याला सिक्युरिटी पॅच रोल आउट करते.

संशोधकांनी मोटोरोला, सोनी, सॅमसंग, एलजी, गुगलचे अनेक मॉडेल्स टेस्ट केले. यात आढळून आले की हॅकर्स सहज या डिव्हाईसच्या युजर्सची खाजगी माहिती चोरी करू शकतात. हॅकर्स या डिव्हाईसमध्ये मालवेअर पाठवून सहज डिव्हाईसला कंट्रोल करू शकतात. खासकरून अँड्राईड किटकॅट व त्याच्या आधीच्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या डिव्हाईसला हॅकर्स निशाणा बनवू शकतात. 2012-13 मध्ये लाँच झालेल्या डिव्हाईसला अधिक धोका आहे.

अँड्राईड युजर्सला आपल्या डिव्हाईसला वारंवार अपडेट करणे गरजेचे आहे. जेणेकरून हॅकिंगपासून वाचता येते. तसेच स्मार्टफोनचा डाटा देखील बॅकअप करावा.

Leave a Comment