बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत लंडनमधील २६ वर्षीय तरुणी


पटना – बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार असून बिहारमध्ये याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रिया चौधरी या नावाची जोरदार चर्चा कालपासून सुरु झाली आहे. स्वत:ला मुख्यमंत्री पदाची उमेदवार म्हणून प्रिया चौधरी यांनी घोषित केले आहे. जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असणाऱ्या प्रिया सध्या लंडनमध्ये आहेत. पण बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये त्यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहिरातीद्वारे घोषित केले आहे.

मूळच्या दरभंगा येथील असून २६ वर्षीय प्रिया या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. पण रविवारी त्यांनी बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये स्वत:चा मोठा फोटो असणारी पानभर जाहिरात दिली आहे. ही जाहिरात अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहे. त्यांनी या जाहिरातीमध्ये आपण मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. बिहारमध्ये सध्या भाजप-जदयू आणि एलपीजीचे संयुक्त सरकार असून नितिश कुमार मुख्यमंत्री आहेत.

Leave a Comment