भारतात येतेय पाल व्ही फ्लाईंग कार


फोटो सौजन्य पत्रिका
जगभरात ऑटो सेक्टरमध्ये नित्यनूतन तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे आणि बाजारात रोज नवीन फिचर्स येणाऱ्या कार्स दाखल होत आहेत. भारतीय ऑटो सेक्टरही त्याला अपवाद नाही. त्यातच आता भारतात लवकरच फ्लाईंग कार पाल व्ही दाखल होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाल व्ही (पर्सनल एअर अँड लँड व्हेईकल )या नेदरलंडच्या कंपनीचे सहअध्यक्ष जॅनपिटर कोइंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फ्लाईंग कार संदर्भात चर्चा केली आणि उडत्या कार प्रकल्पाबद्दल त्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे पाल व्ही च्या उडत्या कार्सच्या चाचण्या भारतात लवकरच सुरु होणार आहेत असे संकेत दिले जात आहेत. या कार्स रस्त्यावर धावतील आणि गरजेनुसार विमान किंवा हेलीकॉप्टर प्रमाणे आकाशात झेपावू शकतील.

वाहन मोड मधून हेलीकॉप्टर मोड मध्ये जायला या कारला १० मिनिटे लागतात. २०२०च्या अखेरी किंवा २०२१ च्या सुरवातीला या कार भारतात लाँच होतील असे समजते. या कारची किंमत २.८९ कोटी रुपये आहे. ही कार दोन सिटर असून आकाशात १२५०० फुट उंचीवरून उडू शकते. आकाशात तिचा सर्वाधिक वेग ताशी २०० मैल तर जमिनीवर ताशी १०० मैल आहे. कंपनीने ७० फ्लाईंग कार्स अगोदरच विकल्या आहेत.

Leave a Comment