ट्रम्प याना विविध पदार्थ खिलाविणारी व्हाईट हाउसमधील महिला शेफ


फोटो सौजन्य पिंटरेस्ट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प त्यांच्या परिवारासह नुकातेच भारतभेटीवर येऊन गेले. या भेटीची मीडियात खूप चर्चा झालीच पण ट्रम्प याना भारतात कोणकोणते खास पदार्थ खिलाविले गेले त्याच्याही भरपूर बातम्या आल्या. त्यानिमित्तान ट्रम्प यांच्या आवडी निवडी, खाण्याच्या सवयी याच्याही चर्चा झाल्या. पण ट्रम्प यांच्या निवासस्थानच्या किचनची जबाबदारी सांभाळणारी शेफ ही व्हाईट हाउस मधली पहिली महिला शेफ आहे याची अनेकांना माहिती नसेल. गेली १५ वर्षे मुळची फिलिपाईन्सची क्रीस्टेटा पासिया कॉमरफोर्ड ही जबाबदारी अतिशय चोखपणाने पार पाडते आहे.

क्रीस्टेटा जॉर्ज बुश ज्युनिअर यांच्या कार्यकाळात शेफ म्हणून व्हाईट हाउस मध्ये दाखल झाली आणि त्यानंतर ८ वर्षे बराक ओबामा यांच्यासाठी आणि आता ट्रम्प यांच्यासाठी ती काम करते आहे. विशेष पक्वाने बनविण्यात तिचा हातखंडा आहे. या पदावर निवड झालेली ती पहिली आशियाई महिला आहे कारण या पूर्वी या पदावर फक्त पुरुषच निवडले जात होते.

सामान्य परिवारातून आलेल्या क्रीस्टेटाचा जन्म फिलिपाईन्समधला आणि तिचे शिक्षणही मायदेशीच झाले आहे. तिने फूड टेक्नोलॉजी मध्ये पदवी घेतली आणि २३ व्या वर्षी ती अमेरिकेत दाखल झाली. त्यानंतर तिने अनेक नामवंत हॉटेल्स मधून खानसामा म्हणून नोकरी केली. १९९५ मध्ये व्हाईट हाउसचे तत्कालीन चीफ शेफ वॉल्टर शिबे होते त्यावेळी अध्यक्ष होते बिल क्लिंटन. त्यावेळी क्रीस्टेटा व्हाईट हाउस मध्ये आली. तिच्या हाताच्या डिश सर्वाना फार आवडत असत.

नवल म्हणजे क्रीस्टेटा आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे एक वेगळेच कनेक्शन आहे. झाले असे की जेव्हा वॉल्टर चीफ शेफ पदावरून निवृत्त झाले तेव्हा नवीन चीफ शेफचा शोध सुरु झाला. याचवेळी मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि त्यांच्यासाठी व्हाईट हाउस मध्ये मेजवानी आयोजित केली गेली होती. अनेक प्रतिष्ठित यावेळी उपस्थित राहणार होते. तेव्हाची सर्व जबाबदारी क्रीस्टेटाने अतिशय कुशलतेने सांभाळली आणि एकसो एक चविष्ट पदार्थ पाहुण्यांना खिलाविले. तिच्याकडे व्हाईट हाउस मध्ये कामाचा १० वर्षाचा अनुभव होताच. त्यामुळे तिचीच निवड चीफ शेफ म्हणून केली गेली.

Leave a Comment