करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तापासून करोना लस


फोटो सौजन्य युएसएन्यूज
जगभर ११२ देशात हातपाय पसरलेला दहशतवादी करोना विषाणू लवकरच संपुष्टात येईल असा दावा केला जात आहे. करोना विरुद्धच्या लढ्यासाठी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्ताचा वापर दुसरे करोनाग्रस्त रुग्ण बरे करण्यासाठी औषध बनविण्यात केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भातील एका रिपोर्ट नुसार संशोधक करोना पासून बचाव करणारी लस बनविण्याच्या अगदी जवळ आले आहेत. त्यावर चीन मध्ये सतत काम सुरु आहेच पण दरम्यान जपानच्या ताकेदा या औषधनिर्माण कंपनीने इम्युन सिस्टीम थेरपी नावाचे औषध तयार केले आहे. याच नावाने हे औषध बाजारात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

विज्ञानानुसार विषाणूपासून वाचलेल्या आणि त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात विशिष्ट प्रोटीन तयार होते. ही प्रोटीन्स या आजाराशी लढणारी असतात आणि विषाणूग्रस्त रुग्णावर त्याचा वापर केला तर नक्की फायदा होतो. याच प्रोटीनना अँटीबॉडीज म्हटले जाते. चीनी लोक स्थानिक रुग्णांवर याच पद्धतीने उपचार करत आहेत पण त्यांना अजून म्हणावे तसे यश आलेले नाही.

Leave a Comment