या ट्रिक्स वापरा आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा दुप्पट आनंद लुटा

इंस्टंट मेसेंजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स लाँच करत असते. युजर्सला देखील व्हॉट्सअ‍ॅपमधील सर्वसाधारण फीचर्स माहित असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही असे खास फीचर्स सांगणार आहोत, ज्याबाबत सर्वांनाच माहिती नसते. या फीचर्समुळे तुम्हाला चॅटिंग करताना अधिक आनंद मिळेल.

हँड्रस फ्री वॉइस नोट रेकॉर्ड –

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही वॉइस नोटचा देखील वापर करू शकता. वॉइस नोट हँड्रस फ्री म्हणजेच इअरफोनने देखील रेकॉर्ड करता येतो. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॉक्सच्या येथे दिलेल्या मायक्रोफोनच्या चिन्हावर टॅप करावे लागेल.

जुने चॅट सर्च करणे सोपे –

जुन्या चॅटला तुम्ही बुकमार्क करू शकता, जेणेकरून पुन्हा सर्च करण्यात तुमचा अधिक वेळ जाणार नाही. तुम्ही चॅटला स्टार मार्क करू शकता. यासाठी चॅटवर प्रेस करून ठेवावे त्यानंतर वरती दिलेल्या स्टार या पर्यायाला निवडावे.

फोन न वापरता ऑनलाईन –

ऑफिसमध्ये काम करत असताना वारंवार व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला उत्तर देणे अवघड असते. अशावेळी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करू शकता व फोन न वापर डेस्कटॉपवरून व्हॉट्सअ‍ॅप चॅटला उत्तर देऊ शकता.

प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन –

तुमचा प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन कोणी बघावे व कोणी नाही, हे देखील तुम्ही निवडू शकता.

मेसेज कधी वाचला –

तुम्ही मित्र-मैत्रिणीला पाठवलेला मेसेज त्याला कधी पोहचला व त्याने कधी वाचला ? याची माहिती देखील तुम्ही मॅसेजवर टॅपकरून मिळवू शकता.

Leave a Comment