उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरासाठी १ कोटींची मदत; निलेश राणेंनी लगावला टोला


मुंबई – माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा लगावला आहे. महाभारत आणि रामायण कलियुगात एकत्र बघायचा योग आला असून, रामाच्या भेटीला महाभारतातील दुर्योधन गेल्याचे निलेश राणेंनी म्हटले आहे. त्याबरोबर राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी? असा सवाल राणेंनी केला आहे.

काल (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा झाला. त्यांनी यावेळी रामलल्लाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी खासदार, मंत्रीही उपस्थित होते. पण, कोरोना व्हायरसचे सावट असल्याने, उत्तर प्रदेश सरकारने सेनेला शरयू नदीकिनारी महाआरती करण्यास परवानगी नाकारली होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून राम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची घोषणा केली. यावरूनच निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment