भारतातील आणखी सहाजणांना कोरोनाची लागण


तिरुवनंतपुरम : दिवसेंदिवस भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून कोरोनाचे आणखी पाच केरळमध्ये तर तामिळनाडूमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी राज्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांसह पाच जणांना कोरोनोची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या पाच जणांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे.

नुकतेच इटलीहून कोरोनाची लागण झालेल्या या कुटुंबातील तीन जण भारतात परतले होते. त्यांना इटलीहून परतल्यानंतर आपल्या काही नातेवाईकांची भेट घेतल्यामुळे आणखी दोघांना या तिघांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली असल्यामुळे कोरोनोबाधित रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. एका लहान मुलाचाही या पाच जणांमध्ये समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत तामिळनाडूचे आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्कटहून 28 फेब्रुवारीला एक व्यक्ती परतला होता. 4 मार्च रोजी त्याला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्याला कोरोना व्हायरस झाल्याचे समोर आले.

Leave a Comment