आफ्रिकेविरुद्धच्या मलिकेत शिखर, हार्दिक आणि भुवनेश्वरचे पुनरागमन


मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून काही भारतीय खेळाडूंना आयपीएल स्पर्धा तोंडावर असताना या मालिकेत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. पण रोहित शर्माला वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यात आलेले नाही.

भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्या आणि जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केले आहे. न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिकला संघात संधी मिळाली असती पण तो फिट नसल्याने त्याला या दौऱ्याला मुकावे लागले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत भुवनेश्वर जखमी झाला होता. तो त्यानंतर उपचारासाठी लंडनला गेला होता. संघात त्याचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय निवड समितीचे नवनिर्वाचित प्रमुख सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील प्रथमच भारतीय संघाची निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसाद यांची जोशी यांनी जागा घेतली होती.


दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.

मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – १२ मार्च, धर्मशाळा
दुसरा एकदिवसीय सामना – १५ मार्च, लखनऊ
तिसरा एकदिवसीय सामना- १८ मार्च, कोलकाता

Leave a Comment