सध्या जगातील सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत अंबानी, बिल गेट्स, जेफ बेझॉस यांची नावे घेतली जातात. मात्र एकेकाळी इतिहासात या सर्वांपेक्षाही श्रींमत व्यक्ती होऊन गेली आहे. या व्यक्तीकडे एवढी संपत्ती होती की तुम्ही त्याचा अंदाज देखील लावू शकत नाही.
ही आहे इतिहासातील आतापर्यंतची सर्वात श्रींमत व्यक्ती
या व्यक्तीचे नाव आहे मनसा मूसा I. मनसा मूसा टिंबकटूचा राजा होता. सध्या टिंबकटू आफ्रिकेतील देश मालीमधील एक शहर आहे. मूसाच्या काळा मालीमध्ये सोन्याच्या भंडार होता. सांगण्यात येते की त्याच्या काळात मालीमध्ये वर्षाला 1000 किलो सोन्याचे उत्पादन होत असे.
मनसा मूसाचे खरे नाव मूसा कीटा प्रथम होते. मात्र राजा झाल्यानंतर त्याचा उल्लेख मनसा असा होऊ लागला. मनसाचा अर्थ ‘बादशाह’ असा होतो. मूसाच्या साम्राज्याचा अंदाजा देखील लावता येणार नाही एवढे मोठे होते. आजचे मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना फासो, माली, नायजर, चाड आणि नायझेरिया हा सर्व प्रदेश मूसाच्या साम्राज्याचा भाग होता.
ईसवी 1312 मध्ये मूसा मालीचा शासक बनला. आपल्या 25 वर्षांच्या शासनकाळात त्याने अनेक मस्जिदींची निर्मिती केली. यातील अने मस्जिदी आजही आहेत.
मनसा मूसा संबंधित एक कथा जगभरात प्रसिद्ध आहे. सांगण्यात येते की ईसवी 1324 मध्ये मूसा मक्केच्या यात्रेला निघाला होता. त्यावेळी त्याच्या ताफ्यात 60 हजार जणांचा समावेश होता. यातील 12 हजार तर त्याचे वैयक्तिक अनुयायी होते. याशिवाय मूसा ज्या घोड्यावर बसला होता, त्याच्या पुढे 500 हत्ती होते व त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात सोन्याची एक-एक काठी होती. सांगण्यात येते की, मनसा मूसाच्या ताफ्यात 80 उंट देखील होते व त्या प्रत्येकावर 136 किलो सोने लादलेले होते.
मनसा मूसा खूप उदार मनाचा असल्याचे देखील सांगितले जाते. जेव्हा तो इजिप्तची राजधानी काहिरा येथून गेला, त्यावेळी त्याने एवढे सोने दान केले की अचानक देखील महागाई वाढली. त्याकाळी यूरोपमधील लोक केवळ मनसा मूसाची अफाट संपत्ती पाहण्यासाठी माली येथे येत असे.