महिला दिन : आपल्या कामगिरीने प्रेरणा देणाऱ्या प्रभावशाली महिला

आज महिला कुटुंबापासून ते व्यवसायपर्यंत सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अनेक महिलांनी वेगळा मार्ग निवड यशाचे शिखर गाठले. देशातील राजकारणात देखील अनेक महिलांनी आपल्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ते पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील अशा अनेक महिलांचा समावेश आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने अशाच काही प्रेरणादायी महिलांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

दीपक संधू –

दीपक संधू भारताच्या पहिल्या महिला मुख्य सूचना आयुक्त होत्या. 5 सप्टेंबर 2013 ला या पदावर सिंधू नियूक्त झाल्या होत्या. त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेमुळे त्यांच्याकडे भारतीय सूचना सेवेतील अनेक महत्त्वपुर्ण पदांची जबाबदारी देण्यात आली होती.

Image Credited – beyondpinkworld

व्ही एस रमा देवी  –

कर्नाटकच्या राज्यपाल राहिलेल्या रमाद देवी भारताच्या प्रथम महिला निवडणूक आयुक्त देखील होत्या. त्यांनी 26 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 1990 या काळात पदभार स्विकारला होता.

Image Credited – britannica

मीरा कुमार –

31 मार्च 1945 ला जन्म झालेल्या मीरा कुमार या माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. 1985 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. 2009 साली त्या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले.

Image Credited – StarsUnfolded

प्रतिभा पाटील –

प्रतिभा पाटील यांना भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 ला महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील नंदगाव येथे झाला. 1962 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होत राजकारणात प्रवेश केला. वयाच्या 27 व्या वर्षीच त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

Leave a Comment