विना पिनचे क्रेडिट-डेबिट कार्डमधून काढले जाऊ शकतात पैसे, असा करा बचाव

मागील काही वर्षात डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये बँकेतर्फे बदल करण्यात आले आहेत. बँकेकडून वाय-फाय चिप असणारे कार्ड देण्यात येत आहेत. मात्र या कार्डमुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, या कार्डमुळे कोणीही विना पिनचे तुमच्या खात्यातून 2 हजार रुपये काढू शकते.

कसे काम करते वाय-फाय चिप असणारे क्रेडिट-डेबिट कार्ड ?

या कार्डला कॉन्टॅक्टलेस कार्ड देखील म्हटले जाते. या कार्डद्वारे विना पिनचा वापर करून पीओएस मशीनद्वारे 2 हजार रुपये काढता येतात. केवळ पीओएस मशीन कार्डला स्पर्श करून कोणीही रक्कम काढू शकते.

Image Credited – Amarujala

या कार्डला भलेही वाय-फाय क्रेडिट-डेबिट कार्ड म्हटले जात असले तरी हे वाय-फायवर काम करत नाही. हे कार्ड एनएफसी (निअर फिल्ड कम्यूनिकेशन) आणि RFID (रेडिओ फ्रिकवेंसी आयडेंटिफिकेशन) टेक्नोलॉजीवर काम करते.

या कार्डमधील एक चिप पातळ मेटल एंटीनाशी जोडलेली असते. याच एंटीनाद्वारे पीओएस मशीनला सिग्नल मिळतो व याच एंटीनाला पीओएस मशीनने रेडिओ फ्रिक्वेंसी फिल्डद्वारे इलेक्ट्रिसिटी मिळते. त्यामुळे कार्ड केवळ पीओएस मशीनच्या संपर्कात येताच, त्यातून कमाल 2 हजार रुपये काढता येतात.

Image Credited – Amarujala

अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी हॉटेल अथवा दुकानात पेमेंट करताना कार्ड दुकानदाराच्या हातात देऊ नये. तुमच्या समोर व्यवहार करावा व आलेला मेसेज तेव्हाच तपासावा.

Image Credited – Amarujala

जर तुमच्याकडे देखील असे कार्ड असेल तर त्याला एल्यूमिनियम फॉइल पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे. याशिवाय तुम्ही मेटल वॉलेटचा देखील वापर करू शकता. बाजारात यासाठी RFID ब्लॉकिंग वॉलेट देखील मिळते.

Leave a Comment