गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर – जितेंद्र आव्हाड


नवी मुंबई : भाजप नेते व आमदार गणेश नाईक यांच्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. नवी मुंबईतील गणेश नाईक हे सर्वात मोठे खंडणीखोर असून त्यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

नवी मुंबई महापालिकेची येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून राष्ट्रवादीने त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणेत यावेळी पार पडलेल्या सभेत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला.

राजकीय आरोप प्रत्योरोपांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असून ते नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईतून भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती. पण राजकीय महत्वाकांक्षेसाठी वडील गणेश नाईक यांनी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली.

येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यासाठी वातावरण निर्मितीसाठी आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. कोपरखैरणे येथे यावेळी झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवार यांनी गणेश नाईकांना सर्व काही दिले. पण ते त्यानंतरही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. बाळासाहेब ठाकरे यांचे जे आयुष्यात होवू शकले नाहीत, ते शरद पवार यांचे काय होणार, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

गणेश नाईकांकडून नवी मुंबईत सर्वात मोठी खंडणी वसूल केली जात आहे. येथील कारखाने, दगडखाणींमधून खंडणी वसूल करणाऱ्या नाईकांची सल्तनत नेस्तनाबूद करण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. रोहित पवार, शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीत सहभाग घेतला. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर बाईक रॅली काढण्यात आली. महाविकास आघाडीची सत्ता येत्या मनपा निवडणूकीत येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागण्याचे आवाहन यावेळी कार्यकत्यांना करण्यात आले.

Leave a Comment