या तंत्रज्ञानाद्वारे फास्टॅग बनणार विश्वस्तरीय

इलेक्ट्रॉनिक टोल संग्रहाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग व्यवस्था सुरू केली आहे. सरकार आता रेडिओ फ्रेक्वेंसी आयडेंटिफिकेशनच्या (आरएफआयडी) मदतीने फास्टॅगने टोल टॅक्स भरणा तंत्रज्ञानाला जागतिक स्तरीय बनविणार आहे. यामुळे टोल नाक्यावर जाम होणार नाही व वाहन चालक अवघ्या 50 सेंकदात टोल भरू शकतील. सोबतच फास्टॅगच्या हेल्पलाइन क्रमांकाला देखील सरकारने अपग्रेड केले आहे.

रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने सांगितले की, या आठवड्यात 1 कोटी फास्टॅगची विक्री झाली आहे. तसेच, दररोज लाखो फास्टॅगची विक्री होत आहे.

फास्टॅग समस्येच्या समाधानासाठी मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर 1033 ला देखील अपग्रेड केले आहे.  दर महिन्याला या नंबरवर फास्टॅग संबंधी 15 हजार तक्रारी येत आहेत.

सरकार टोल नाक्यावरील ईटीसी तंत्रज्ञानाला विश्वस्तरीय बनविण्यासाठी योजना बनवत आहे. यामुळे टोल नाक्यावर वाहन चालक फास्टॅगद्वारे ऑनलाईन टोल टॅक्स 50 सेंकदात जमा करतील. याशिवाय प्रवास सोपा करण्यासाठी टोल नाक्यावर कार आणि ट्रकसाठी वेगळी लेन करण्याची देखील योजना आहे.

फास्टॅगद्वारे टोल भरण्यासाठी येणाऱ्या अडचणीला लक्षात घेऊन सरकारने टोल नाक्यावर बॅरिअर कॅबिनच्या पुढे फास्टॅग रीडिंग सेंसर लावण्याची योजना बनवली आहे. सेंसर फास्टॅगला वेळेत रीड करू शकत नाही. या गडबडीमुळे मंत्रालयाने सेंसरला टोलपासून 20 मीटर आधीच लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे वाहन कॅबिनपर्यंत पोहचण्याच्या आधीच सेंसर फास्टॅगला रीड करू शकेल व ऑनलाईन टोल भरला जाईल.

Leave a Comment