होळी विशेष : रंग खरेदी करताना या गोष्टी राहू द्या लक्षात

होळी सणाच्या तयारी देशाच्या कोपऱ्या कोपऱ्या उत्साहात सुरू आहे. होळी-धुलीवंदनच्या निमित्ताने बाजार रंग, गुलाल आणि पिचकाऱ्यांनी सजला आहे. मात्र होळीला रंग, गुलाल खेळण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बाजारात असलेल्या रंग केमिकलचे मिश्रण करून बनविण्यात आलेले असतात.

सध्या बाजारात केमिकल असलेल्या रंगाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. या रंगांना वीटांची पावडर, वाळू, माती आणि राखमध्ये विविध प्रकारचे केमिकल टाकून तयार केले जाते. केमिकल असलेल्या रंगांचा वापर केल्यास त्वचा, केस आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते.

एवढेच नाही तर जर हे रंग शरीराच्या आत गेल्यास शरीरातील आतील अवयवांना यामुळे नुकसान पोहचू शकते. त्यामुळे होळीला रंग खरेदी करताना काळजी घ्यावी.

हर्बल गुलाल –

जर तुम्ही हर्बल गुलाल खरेदी करत असाल तर त्याला हातात घेऊन पाहा. हा गुलाल बोटांवर घेतल्यावर लगेच कळतो. मात्र केमिकल असणाऱ्या गुलालात खरखरीतपणा जाणवतो.

लॅब टेस्ट सर्टिफिकेट –

रंग खरेदी करणाऱ्या अनेकांना माहिती नसते की होळीचे रंग आणि गुलाल तयार करणाऱ्या कंपन्या लॅब टेस्ट सर्टिफिकेट पाकिटावर छापतात. रंग खरेदी करताना हे सर्टिफिकेट नक्की पाहावे.

पॅच टेस्ट –

रंगांचे स्किन पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. रंग खरेदी करताना थोडासा रंग हातावर लावून पाहावे.  जर खाज अथवा अन्य एलर्जी न जाणवल्यास बेफिकिर होऊन तो रंग खरेदी करा.

 

Leave a Comment