जाणून घ्या ‘ड्रॅगन फ्रूट’चे फायदे

ड्रॅगन फ्रूटला सुपरफ्रूट देखील म्हटले जाते. कारण याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मधमुहे आणि ह्रदयाच्या समस्येसाठी देखील हे फळ फायदेशीर ठरते. या फळाच्या फायद्याविषयी जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास मदत

ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी भरलेले असतात व त्यांच्यात कॅलेरी देखील कमी असते. यातील उच्च फायबर निरोगी वजन कायम ठेवण्यात व आरोग्याच्या समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

आजारांशी लढण्यास मदत –

ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते. जसे की विटामिन सी आणि कॅरोटेनॉइड सारखे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

आतड्यांसाठी चांगले –

या फळात प्रीबायोटिक्सचे प्रमाण अधिक आहे व चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवण्यास याची मदत होते. पाचनतंत्रात देखील यामुळे सुधारणा होते.

रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत –

फळातील विटामिन सी आणि कॅरोटीनॉयड रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते व पांढऱ्या रक्त पेशींचे संरक्षण करते.

अशक्तपणा असणाऱ्यांसाठी फायदेशीर –

ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे. या फळामुळे व्यक्तीच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते व अशक्तपणा दूर होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment