ऑस्ट्रेलियन महिलांनी पाचव्यांदा कोरले टी-20 विश्वचषकावर नाव


मेलबर्न – ऑस्ट्रलियाच्या महिला संघाने मेलबर्नच्या मैदानात महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिलांचा स्वप्न भंग करत पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. सलामी फलंदाज बेथ मूनीच्या नाबाद ७८ धावा आणि एलिसा हेलीच्या झंजावत ७५ धावांच्या जोरावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी निर्धारित २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांची तारांबळ उडाली.

अंतिम सामन्यातही विश्वचषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेणारी शेफाली वर्मा (२) स्फोटक फलंदाज स्मृती मानधना ११ हरमनप्रीत कौर ४ यांचा फ्लोप शो कायम राहिला. दिप्ती शर्माने भारताकडून सर्वाधिक ३३ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडी फलंदाजीच्या फ्लोप शोमुळे भारताला शंभरीही पार करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांना १९.१ षटकात ९९ धावांवर गारद करत पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.

Leave a Comment