तर आयपीएल रद्द होणार ?

कोरोना व्हायरसच्या भितीने जगभरातील अनेक मोठमोठे इव्हेंट रद्द करण्यात आले आहेत. आता या व्हायरसचे सावट 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सीझनवर देखील दिसून येत आहे. याआधी आयपीएलच्या बक्षीसांच्या रक्कमेत 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे व फ्रेंचाईजींना देखील सामन्याच्या आयोजनासाठी राज्य संघटनांना 30 लाखांऐवजी 50 लाख रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आता कोरोना व्हायरसमुळे आयपीएलला मोठा फटका बसू शकतो.

एका सिनियर फ्रेंचाईजी एग्झिक्यूटिव्हनुसार, आयपीएल चालू होण्यास अद्याप तीन आठवडे आहेत. या कालावधीत जर वृत्तपत्राच्या हेडलाईन सांगत असतील की कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. तर तो विचार नक्कीच मनात राहील. त्यामुळे अशा परिस्थिती गर्दीत मी स्वतःला स्टेडियममध्ये पाहू शकणार नाही. त्यामुळे हे नक्कीच चिंताजनक आहे.

होस्टिंगसाठी खर्च करण्यात आलेले पैसे मिळवण्यासाठी फ्रेंचाईजींसाठी आयपीएलचे सामने हा मार्ग आहे. ब्रँडिंग, मर्चंडाइस, हॉस्पिटॅलिटीद्वारे हा खर्च वसूल करता येतो. मात्र कोरोना व्हायरसमुळे यावर परिणाम होऊ शकतो.

सुत्रांनुसार, यामुळे स्पॉन्सर्सवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने याबाबत केंद्राकडे देखील सल्ला मागितला आहे. मात्र अद्याप केंद्राकडून यावर उत्तर आलेले नाही. याशिवाय इतर बोर्डाने देखील आपल्या खेळाडूंबाबत अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही.

Leave a Comment