वैज्ञानिकांनी पकडला ‘जिंवत’ कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसबाबत माहिती नसल्याने वैज्ञानिक देखील यावर संशोधन करत आहेत. मात्र आता वैज्ञानिकांच्या एका टीमने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसची संरचना जाणून घेण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही तर जेव्हा हा व्हायरस एखाद्या पेशीत संक्रमित होतो, त्यावेळी या पेशींची काय स्थिती असते, याचा फोटो घेण्यास वैज्ञानिकांना यश आले आहे.

या कामगिरीमुळे आता कोरोना व्हायरसची ओळख करणे, विश्लेषण आणि संशोधन करण्यास मदत मिळणार आहे. यामुळे वैज्ञानिकांना यावरील लस मिळण्यास मदत होणार आहे.

दक्षिण चीनच्या शेनजेन रिसर्चरच्या एका टीमने या संदर्भात एक फोटो जारी केला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस कसा दिसतो, हे सांगण्यात आले आहे. या फोटोला फ्रोजेन मायक्रोस्कोप एनालिसिस टेक्नोलॉजीच्या मदतीने कैद करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे व्हायरसचे जैविक नमून सुरक्षित करण्यात आले व ज्याद्वारे हे समजते की हा व्हायरस जिंवत असताना कोणत्या स्थितीमध्ये व कसा होता ?

रिसर्च टीमचे सदस्य आणि असोसिएट प्रॉफेसर लिउ चुआंग यांनी सांगितले की, व्हायरसच्या ज्या संरचनेला आम्ही पाहिले ते एकदम हुबेहुब तसेच होते, जे व्हायरस जिंवत असल्यावर असते.

Leave a Comment