चक्क स्मार्टफोनमुळे वाचले महिलेचे प्राण

ह्युवाई स्मार्टफोनच्या दीर्घ बॅटरी बॅकअपमुळे एका महिलेचे प्राण वाचल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका अपघातानंतर महिला तीन दिवस बेशुद्ध होती व शुद्धीवर आल्यानंतर आपल्या फोनच्या मदतीने तिने इमर्जेंसी नंबरवर कॉल केला.

यात खास गोष्ट म्हणजे या तीन दिवसात फोन डिस्चार्ज झाला नाही व फोनने दीर्घ बॅटरी बॅकअप दिला. फोन डिस्चार्ज झाला असता तर महिलेला इमर्जेंसी सर्व्हिसला कॉल करता आला नसता.

42 वर्षीय बेथ मॅकडेरमॉट एकट्या राहतात. पाय घसरल्याने पायऱ्यांवरून त्या खाली पडल्या. या घटनेत त्यांचा डोक्याला दुखापत झाली व त्या बेशुद्ध झाल्या. तीन दिवस त्या बेशुद्ध होत्या. शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे पाय काम करत नव्हते. त्यांना जागेवरून हालता देखील येत नव्हते. अशावेळी त्यांचा ह्युवाईचा स्मार्टफोन कामाला आला. तीन दिवसानंतर देखील बॅटरी बॅकअप असल्याने अखेर बेथ यांनी इर्मेजेंसी नंबरवर कॉल केला. यानंतर रुग्णवाहिकेने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

बेथ या बाबत म्हणाल्या की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता. मला विश्वास बसत नाही की मी आतापर्यंत जिंवत आहे. जर फोन नसता, तर असे झाले नसते.

Leave a Comment