एकेकाळी राहत होती भाड्याने, आज तेथेच या गायिकेने बांधला अलिशान बंगला

नेहा कक्कर आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते. इंडियन आयडल या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून प्रवास सुरू केल्यानंतर आता त्याच कार्यक्रमाचे जज होण्याचा नेहाचा प्रवास संघर्षमय होता. तिने आज जे काही मिळवले ते सर्व मेहनतीच्या जोरावर. आता नेहाने सोशल मीडियावर आपल्या लहानपणीचे दिवस आठवत आपल्या जुना घराचा फोटो शेअर केला आहे.

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने तिचे आताचे घर आणि लहानपणीचे घर असे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरूनच तिचा आतापर्यंतच प्रवास लक्षात येतो. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहाने हे फोटो शेअर करत लिहिले की, हा आमचा बंगला, जो ऋषिकेश येथे आहे आणि दुसरा फोटो त्या घराचा आहे, जेथे माझा जन्म झाला. या घरात आमचे कक्कर कुटुंब एका खोलीत राहत असे. ज्यात माझ्या आईने एक टेबल लावला होता, तेच छोट्याशा खोलीत आमचे किचन होते. ती खोली आमची स्वतःची देखील नव्हती. आम्ही त्यासाठी भाडे भरत असू. आता त्याच शहरात जेव्हा मी स्वतःचा बंगला बघते, तेव्हा भावूक होते.

या पोस्टवर अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी नेहाचा प्रवास प्रेरणादायी असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment