हे आहे आगळेवेगळे घोस्ट हाउस


फोटो सौजन्य पत्रिका
जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी झपाटलेली घरे आहेत. पण एक वेगळेच घोस्ट हाउस ब्रिटनच्या वॉरवीकशायर मधील मोरेटन पोडॉक्स गावात बांधले गेले आहे. अर्थात या घरात भुते वगैरे राहत नाहीत, माणसेच राहतात पण या घरचे डिझाईन असे आहे की आपोआप या घराला घोस्ट हाउस असे नाव मिळाले आहे.

या घरात स्वीमिंग पूल पासून हायटेक किचन पर्यंत सारी सुखे आहेत. हे घर जमिनीत एम्बेडेड म्हणजे जमिनीत गुंफल्याप्रमाणे आहे. त्यामुळे घराचा फारच थोडा भाग जमिनीच्या वर दिसतो. घर बांधताना काळे लोखंड आणि काचांचा अश्या खुबीने वापर केला आहे की घराचा वरचा मजला जणू तरंगतो आहे असे वाटावे.

मुख्य दरवाजातून प्रवेश करताना प्रथम खोल अंगणात उतरून मग स्वीमिंग पूल खाली पाउल टाकावे लागते. येथे जाण्यासाठी काच आणि स्टील पासून रस्ता तयार केला गेला आहे. घरात काचेच्या भिंतीत एक सुरेख अंगणही आहे. घराच्या भिंती चकाचक असल्याने बाहेरचे सर्व दृश्य घरात आल्याचा भास होतो.

या घराचे मालक स्टीव्ह स्मिथ सांगतात मला काहीतरी वेगळे करायला आवडते त्यातून या घोस्ट घराची उभारणी केली आहे. बिपीएन या आर्किटेक्ट फर्मची मदत घेतली असली तरी घराचे डिझाईन त्यांनी स्वतः तयार केले. २००३ मध्ये या घरासाठी जमीन खरेदी केली तेव्हा कवडीमोलाच्या भावात जमीन मिळाली होती. मात्र हे घर बांधले गेल्यावर या भागातील जमिनीच्या किमती एकदम वाढल्या असून या घराची किंमत २४ कोटींवर गेली आहे.

Leave a Comment