जगातील प्रत्येकाला ९ कोटी मिळवून देणारा उल्कापिंड


फोटो सौजन्य पत्रिका
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने अतिमौल्यवान ठरू शकेल अश्या एका क्षुद्रग्रह किंवा उल्कापिंडाचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हा उल्कापिंड पूर्णपणे लोखंडाचा बनलेला असून यावरचे लोखंड विकले तर पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला किमान ९ कोटी रुपये मिळतील असे सांगितले आहे. ब्रिटीश वृत्तपत्र द टाईम्सच्या रिपोर्टनुसार या उल्कापिंडाची किंमत आठ हजार क्वाट्रीलीयन पौंड म्हणजे ८ वर १५ शून्ये इतकी आहे. या लघुग्रहाला नासाने ‘ १६ सायकी’ असे नाव दिले आहे.

नासाने स्पेस एक्सचे मालक एलन मस्क याना मदतीचे आवाहन केले आहे. नासाने मस्क यांनी त्यांच्या अंतराळ मिशनची सुरवात या पिंडापासून करावी असे आवाहन केले असून त्यामुळे या ग्रहावरील लोखंड तपासणीसाठी पृथ्वीवर आणता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. या ग्रहावरील प्रचंड खनिज भांडारामुळे वैज्ञानिक उत्साहित झाले आहेत. अर्थात या लघुग्रहावरचे लोखंड पृथ्वीवर आणण्याची अजून कोणतीही योजना आखली गेली नसल्याचा खुलासा नासाने केला आहे. या लघुग्रहावर जाऊन परतण्यासाठी ७ वर्षे लागणार आहेत.

या ग्रहाचा व्यास २२६ किमी असून त्याला सूर्याभोवती एक फेरी मारायला पृथ्वीवरची पाच वर्षे लागतात. त्याच्यावरचा एक दिवस ४ तासांचा असून या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या १ टक्का आहे. हा पिंड मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे.

Leave a Comment