पॉपअप कॅमेऱ्यासह लाँच झाला इन्फिनिक्स एस ५ प्रो


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
पॉपअप कॅमेरा असलेला सर्वात अॅफोर्डेबल स्मार्टफोन इन्फिनिक्स एस ५ प्रो नावाने भारतात लाँच झाला आहे. बजेट सेगमेंटमध्ये हा फोन १४ तासाच्या बॅटरी बॅकअप सह ९९९९ किमतीत फ्लिपकार्टवर १३ मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. फॉरेस्ट ग्रीन आणि व्हायलेट कलर मध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोनला ६४ जीबी इंटरनल मेमरी असून ती मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.

या फोनला ४ जीबी रॅम, ६.५३ इंची फुल एचडी स्क्रीन, रिअर पॅनल थ्रीडी ग्लास फिनिश सह ट्रिपल कॅमेरा सेटअप सह आहे. यात ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, २ एमपीचा पोर्ट्रेट कॅमेरा आणि डेडीकेटेड लो लाईट सेन्सर असून सेल्फीसाठी १६ एमपीचा पॉपअप कॅमेरा दिला गेला आहे. यामुळे युजरला फुल डिस्प्ले मिळणार आहे. पॉप अप कॅमेऱ्यात एआय पोर्ट्रेट व थ्रीडी फेसब्युटी मोड अशी फिचर्स आहेत. पॉप अप मोड्युल डस्ट व स्प्लॅशप्रूफ आहे.

Leave a Comment