उकळत्या ज्वालामुखीच्या तोंडावरून रोपवॉक


फोटो सौजन्य भास्कर
अमेरिकेतील ४१ वर्षीय डेअरडेव्हील निक वालेंडा याने बुधवारी निकाराग्वामधल्या सक्रीय ज्वालामुखी मासाया वरून रोपवॉक करणारी पाहिली व्यक्ती असे रेकॉर्ड नोंदविले. या स्टंटसाठी या माउथ ऑफ हेल क्रेटरवर निकने १८०० फुट उंचावर दोरी बांधली आणि ३१ मिनिटे २३ सेकंदात हे क्रेटर पार केले.

हा ज्वालामुखी धुमसता आहे आणि कोणत्याही सक्रीय ज्वालामुखी जवळ जाणे हे धोकादायक असते. कारण यातून उसळणारा लाव्हा आणि विषारी वायू जीवघेणे ठरू शकतात. तरीही निकने ही जोखीम पत्करली. विषारी वायूपासून संरक्षणासाठी त्याने गॅस मास्क व डोळ्यावर चष्मा वापरला तसेच ज्वालामुखीच्या ज्वालांमुळे निर्माण होणाऱ्या धगीपासून पायांना संरक्षण मिळावे म्हणून विशेष जोडे वापरले. निक जेव्हा हे क्रेटर दोरावरून पार करत होता तेव्हा वारे वेगाने वाहत होते.

निक प्रसिध्द वालेंडा सर्कस परिवाराच्या सातव्या पिढीतील कलाकार आहे. निक करत असलेला हा स्टंट कव्हर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिडियाची उपस्थिती होती. रेकॉर्ड नोंदविल्यावर निकने हा प्रवास छान होता आणि क्रेटरमधील लाव्हाच्या ज्वाला अगदी मोहमयी होत्या असे सांगितले. गतवर्षी जून मध्ये निक आणि त्याची बहिण लीजना यांनी न्युयॉर्क टाईमस्क्वेअर मधील २५ मजली इमारतीवर रोपवॉक केला होता.

Leave a Comment