खायचे वांदे झालेल्या देशाच्या राष्ट्रपतींचे 6 मुले जन्माला घालण्याचे आवाहन

व्हेनेझुएला हा देश सध्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. हा देश उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. येथील नागरिक देशसोडून दुसऱ्या देशात रोजगारासाठी पलायन करत आहेत. लहान मुलांना जेवायला अन्न मिळत नाही. मात्र या सर्व गोष्टीतही व्हेनेझुएलचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी विचित्र वक्तव्य केले आहे.

ज्या देशातील लोकांच्या दररोजच्या गरजा भागत नाहीत, अशा देशातील राष्ट्रपतींनी महिलांना चक्क 6 मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.

भयंकर आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करत असणाऱ्या व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. निकोलस यांनी आपल्या देशातील महिलांना 6 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. या आवाहना मागे त्यांचा तर्क आहे की, यामुळे व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती भक्कम होईल.

निकोल यांनी बर्थ प्रोग्रामचा प्रचार करणाऱ्या एका टिव्ही कार्यक्रमात हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, देवाने तुम्हाला देशासाठी सहा मुले आणि मुली जन्माला घालण्यासाठी आशिर्वादे द्यावा. सर्व महिलांना सहा मुले जन्माला येईल पर्यंत जन्म देत राहावा. आपल्या मातृभूमीला वाढवावे.

संयुक्त राष्ट्रानुसार, देशातील आर्थिक संकट, महागाई अशा अनेक कारणांमुळे 2015 पासून 45 लाख नागरिकांनी देश सोडला आहे.

Leave a Comment