वाहनांचा थर्ड पार्टी विमा हफ्ता वाढण्याची शक्यता

एक एप्रिल 2020 पासून कार, दुचाकी वाहने आणि व्यावसायिक वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विमा नियामक इरडानुसार, थर्ड पार्टी विम्याचे प्रिमियम (हफ्ता) वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

इरडाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 1,000सीसी पेक्षा कमी कारचा थर्ड पार्टी विमा प्रिमियम 5.3 टक्क्यांनी वाढवून 2,182 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या हा प्रिमियम 2,072 रुपये आहे. याच प्रकारे 1,000 सीसी ते 1,500 सीसी क्षमता असणाऱ्या कारचा प्रिमियम 3,221 वरून वाढवून 3,383 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र 1,500सीसी पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या कारच्या प्रिमियममध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

हा नवीन प्रस्ताव सर्वसाधारणपणे 1 एप्रिलपासून लागू होतो. या प्रस्तावावर 20 मार्चपर्यंत इरडाने लोकांकडून आपली मते मागवली आहेत.

Leave a Comment