येस बँकेवर ‘आरबीआय’चे ३ एप्रिलपर्यंत निर्बंध


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध लादल्यामुळे आता आपल्या खात्यामधून येस बँकेच्या ग्राहकांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार आहे. आरबीआयने हे पाऊल येस बँकेवरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे उचलल्याचे म्हटले आहे.

लागू झालेले हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. त्याचबरोबर येस बँकेचे संचालक मंडळही या ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, बँकेच्या प्रशासकपदी एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

५० हजारांपेक्षा जास्त रक्कम येस बँकेच्या खातेदारांना काढायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नसमारंभ या तीन कारणांसाठीच खातेदार आपल्या खात्यातून जादाची रक्कम काढू शकणार आहेत.

Leave a Comment