रानू मंडलचे ‘तारे जमीन पर’


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. सोशल मीडियावर जसा तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तसे तिचे अवघ्या आयुष्य बदलून गेले. पण तिच्या पदरी पडलेले हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. रानूवर आता काही दिवसांतच पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. सध्या ती तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.

रानू मंडल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर, बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी देखील दिली. पण रानूला तिच्या वाट्याला आलेले हे स्टारडम कायम स्वरुपी टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता एवढी होती की, लोकांची तिला पाहण्यासाठी गर्दी जमा होत असे, पण हे सर्व तिला हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरे देणे यासर्वामुळे तिच्या पदरी तिचे जूने दिवस परत आल्याची सध्या चर्चा आहे.

Leave a Comment