‘टाइम’च्या दशकातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये इंदिरा गांधी आणि अमृत कौर यांचा समावेश

भारताच्या माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्य सेनानी अमृत कौर यांना टाइम मासिकाने मागील दशकातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केले आहे. टाइम मासिकाने ‘स्पॉटलाइट्स इंफ्लूएंशल वूमन हू वर ऑफ्टन ओव्हरशॅडोड’ नावाने एक यादी जाहीर केली आहे.

टाइम मासिकाने वर्ष 1947 आणि 1976 साली क्रमशः अमृत कौर आणि इंदिरा गांधींना ‘वूमन ऑफ द ईअर’ घोषित केले होते. याचेच एक स्पेशल कव्हर प्रकाशित केले आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या 600 नामांकनांपैकी 100 प्रभावशाली महिलांची निवड करण्यात आली आहे.

टाइम मासिकानुसार, 100 प्रभावशाली महिलांच्या विशेष कव्हरद्वारे त्या प्रभावशाली महिलांना समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील अनेक महिलांनी ते स्थान मिळवले आहे, जेथे एकेकाळी केवळ पुरूषांची निवड केली जात असे. या महिलांनी आपली सक्रियता आणि संस्कृतिद्वारे आपला प्रभाव पाडला आहे.

या व्यतिरिक्त या यादीमध्ये डिझाईनर कोको चॅनेल, लेखिका व्हर्जिना वूल्फ, महाराणी एलिजाबेथ, अभिनेत्री मार्लिन मोनरो, राजकुमारी डायना, चीनी फार्मासिटिकल केमिस्ट टू यूयू, सादाको ओगाता आणि मिशेल ओबामा यांचा देखील समावेश आहे.

Leave a Comment