गेमर्ससाठी आता आला ‘गेमिंग बेड’

ऑनलाईन गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी जपानच्या बाहुते नावाच्या एका रिटेल कंपनीने थेट गेमिंग बेडच बनवला आहे. या बेडवर अगदी आरामशीर झोपून गेम खेळता येते. या बेडमध्ये एका मेट्रेससोबत एलिव्हेटिड हेड बोर्ड लावण्यात आलेला आहे व एक डेस्क देण्यात आले आहे. गेम खेळताना स्नॅक्स खाण्यासाठी स्नॅक होल्डर मिळेल. सोबतच गेम खेळताना फोन पडू नये, यासाठी स्मार्टफोन होल्डर देखील यात मिळेल.

या बेडला नॉर्मल बेड, स्नॅक होल्डर आणि गेमिंग ब्लँकेट असे तयार केले असले तरी युजर्सला गेमिंग बेडला संपुर्णच खरेदी करावे लागेल. या बेडची किंमत 1100 डॉलर (जवळपास 81 हजार रुपये) आहे.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गेमिंग बेडबद्दल सांगितले की, या बेडला बनविण्याआधी आम्ही विचार करत होतो की, जर आडवे पडून गेमचा आनंद घेता येत असेल तर युजर्सला उभे राहून अथवा खुर्चीवर बसून गेम खेळण्याची गरज नाही.

याशिवाय हे बेड असे बनविण्यात आले आहे, ज्याद्वारे गेम खेळताना पाठ दुखणार नाही.

Leave a Comment