अशाप्रकारच्या ईमेलवर क्लिक केल्यास होईल मोठे नुकसान

ऑनलाईन बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणात मागील काळात मोठी वाढ झाली आहे. हेकर्स फेक मेसेज आणि ईमेलद्वारे लोकांना शिकार बनवत आहेत. बनावट ईमेल पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, सोबत खाजगी माहिती देखील लीक होते.

Image Credited – Amarujala

पासवर्डवाले ईमेल –

अनेकदा युजर्स पासवर्ड  बदलण्यास सांगणारे ईमेल येत असतात. मात्र गुगलकडून अशाप्रकारचा कोणताही ईमेल येत नसतो. अशाप्रकारचे ईमेल आल्यावर त्यावर क्लिक करू नये.

Image Credited – Amarujala

प्रेस रिलीजचा ईमेल –

हॅकर्स अनेकदा ऑफिसच्या नावाखाली ईमेल पाठवत असतात. यामध्ये काही निर्देश आणि लिंक दिले जातात. अशा संशयास्पद ईमेलमधील लिंकवर क्लिक करू नये.

Image Credited – Amarujala

मेल आयडी डिएक्टिव्हेट होणारा ईमेल –

हॅकर्स फसवणुकीसाठी ई-मेल अकाउंट बंद होणार आहे, असा ईमेल पाठवतात. सोबतच त्यात पासवर्ड रिसेट करण्यास सांगतात. मात्र चुकूनही असा ईमेल उघडू नये.

Image Credited – Amarujala

मेडिकल पॉलिसी –

अनेक हॅकर्स ऑफिसच्या नावाने नवीन मेडिकल पॉलिसी संदर्भात मेल पाठवतात व लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. मात्र अशा ईमेलपासून सावध राहावे.

Image Credited – Amarujala

कंपनीची पॉलिसी –

हॅकर्स कंपनीच्या पॉलिसी संदर्भात बनावट ईमेल पाठवतात व लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना तुमची खाजगी माहिती मिळते. त्यामुळे अशा ईमेलपासून सावध राहावे. लोक ऑफिसच्या नावावर अधिक प्रमाणात फसवणुकीचे शिकार होतात.

Leave a Comment