कोरोनाच्या भितीने जगभरातील हे मोठे इव्हेंट झाले रद्द

कोरोना व्हायरसच्या भितीने मध्यप्रदेशच्या इंदुर येथे होणारा आइफा पुरस्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आयोजकांनी या सोहळ्याची पुढील तारीख अद्याप सांगितलेली नाही. कोरोनामुळे एखादा कार्यक्रम रद्द होण्याची ही पहिली वेळ नसून, याआधी जगभरातील अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत.

पंतप्रधानांचा बेल्झियमचा दौरा –

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्झियमचा दौरा केला आहे. मोदी ब्रसेल्समध्ये भारत-यूरोपियन युनियन समेंलनात सहभागी होणार होते.

जिनपिंग यांचा जपान दौरा रद्द –

या व्हायरसमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जपानचा दौरा रद्द केला आहे.

होळी मिलन कार्यक्रम –

कोरोना व्हायरसचा भारतातील वाढता प्रसार पाहून पंतप्रधान मोदींनी होळी मिलन समारोहात भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे.

2020 विश्वकप क्वॉलिफायर, टी-20 प्रिमियर लीगला स्थगिती –

आयसीसीने वर्ल्ड कप चॅलेंज लीग-ए (क्वॉलिफायर स्पर्धा) रद्द केली आहे. तसेच नेपाळमध्ये होणारे एव्हरेस्ट प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली आहे.

पॅरिस मॅरोथान –

5 एप्रिलला होणारी ही मॅरोथान कोरोना व्हायरसमुळे 18 ऑक्टोंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

जेम्स बाँडचा चित्रपट –

कोरोना व्हायरसमुळे जेम्स बाँडपटातील आगामी चित्रपटा ‘नो टाइम टू डाय’च्या प्रदर्शनाची तारीख टाळण्यात आली आहे.

टेक्नोलॉजी इव्हेंट रद्द –

कोरोना व्हायरसच्या भितीने गुगलचा वार्षिक I/O इव्हेंट, फेसबुकची एफ8 डेव्हलपर्स कॉन्फ्रेंस, मायक्रोसॉफ्टचे एमव्हीपी समिट, शाओमीचा भारतातील प्रोडक्ट लँच इव्हेंट आणि जगातील सर्वात मोठा फोन शो मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 देखील रद्द करण्यात आले आहे.

Leave a Comment