कोरोनामुळे असे बदलणार जग, महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिंद्रा यांनी बुधवारी ट्विट करत आपल्या फॉलोअर्सला विचारले होते की, कोव्हिड 19 ने जग रिसेट कसे होईल ?

या प्रश्नावर युजर्सनी त्यांना असंख्य व्हिडीओ पाठवले. यातील एक हटके व्हिडीओ महिंद्रांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, काल मी ट्विटरवर विचारले होते की कोव्हिड 19 ने जग रिसेट कसे होईल ? तेव्हापासून मला असंख्य मिम्स आले आहेत. त्यातीलच हा एक खास आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक स्वतः बाहेर जाण्यापासून वाचत आहेत व सामान आणण्यासाठी कुत्र्याला मास्क घालून बाहेर पाठवत आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर 14 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी या व्हिडीओला लाईक केले आहे. युजर्स व्हिडीओतील कुत्र्याच्या कामगिरीचे कौतूक देखील करत आहेत.

Leave a Comment