जगातील सर्वाधिक लांबीचा दात काढण्याचे भारतीय डॉक्टरचे रेकॉर्ड


फोटो सौजन्य झी न्यूज
मध्यप्रदेशातील खरगोज येथील दाताचे डॉक्टर सौरभ श्रीवास्तव यांनी जगातील सर्वाधिक लांबीचा दात काढण्याचे रेकॉर्ड केले असून त्यासाठी त्यांनी लिम्का बुक आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला आहे असे समजते.

या पूर्वी जगातील सर्वाधिक लांबीचा दात काढण्याचे रेकॉर्ड जर्मनीच्या मॅक्स लुक या डेंटिस्टच्या नावावर आहे. त्यांनी डॉ. जेमिन पटेल या मूळच्या बडोद्याच्या माणसाचा दात शस्त्रक्रिया करून काढला होता. या दाताची लांबी ३६.७ मिमी होती. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे.

सौरभ श्रीवास्तव यांनी त्याच्याकडे आलेल्या २० वर्षीय पवन भावसार या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा एक दात २९ फेब्रुवारी रोजी काढला त्याची लांबी ३६ मिमी होती तर त्यानंतर काढलेल्या दुसऱ्या दाताची लांबी ३९ मिमी भरली. सौरभ यांनी लिम्का बुककडे ऑनलाईन दावा केला असून त्यासाठी मेडिकल रिपोर्ट व एक्सपर्ट रिपोर्ट दिला जाणार आहे. हे झाले की सौरभ यांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये सर्वाधिक लांबीचा दात काढणारे म्हणून होऊ शकेल.

Leave a Comment