किमच्या कोरियात लाल लिपस्टिक लावल्यास मृत्युदंड


फोटो सौजन्य फिमेल नेटवर्क
उत्तर कोरियात अनेक कायदे खुपच विचित्र असल्याचे वारंवार चर्चिले जाते. अभिनेत्री नारा कांग हिने एका न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीत ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नारा सांगते, जगभरातील बहुतेक सर्व महिला लाल रंगाच्या लिपस्टिकला प्रथम पसंती देतात. मात्र उत्तर कोरियात लाल रंगाची लिपस्टिक लावण्यास बंदी आहे कारण हा रंग भांडवलशाहीचा मानला जातो. हा नियम मोडणाऱ्या महिलेस मृत्युदंड ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे महिला येथे लाल रंगाची लिपस्टिक वापरण्यास घाबरतात.

अन्य नियमांबद्दल बोलताना ती म्हणाली, येथे मेकअप वर सुद्धा बंदी आहे. येथे मेकअप करणे म्हणजे आयुष्य धोक्यात घालणे आहे. मेकअप केला तर अगोदर स्थानिक लोक हेटाळणी करतातच पण येथे रस्त्यावर दर दहा मीटरवर मेकअप पोलीस पथके असतात. ते तुम्हाला शिक्षा करतात. येथे अंगठी, ब्रेसलेट वापरणे, केस मोकळे सोडणे यावरही बंदी आहे.

अन्य एका न्यूज चॅनलच्या बातमीनुसार येथे मिनी स्कर्ट वापरणे, जीन्स वापरणे, ग्राफिक शर्ट किंवा इंग्रजी अक्षरे असलेले कोणतेच कापड वापरता येत नाही. प्रथम नियम मोडणाऱ्याची सार्वजनिक चौकात बेइज्जती केली जाते, दुसऱ्यावेळी नियम मोडला तर मजुरीची शिक्षा दिली जाते आणि वारंवार नियम मोडला तर ते सरकारविरोधातील बंड समजून मृत्युदंड ठोठावला जातो.

Leave a Comment