राममंदिरसाठी मोहमद इस्लाम देणार रामसीतेचे दुर्मिळ नाणे


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
अयोध्येतील रामजन्म भूमी बद्दल अनेक वर्षे वादविवाद, आरोपप्रत्यारोप केले गेल्यानंतर आता मात्र राममंदिर उभारणी हे सांप्रदायिक सौहार्दाचे उदाहरण बनताना दिसते आहे. आजमगढ येथील मोहम्मद इस्लाम यांनी राममंदिर उभारणीसाठी त्यांच्या जवळ असलेले प्राचीन, अष्टधातूचे आणि रामसीता व हनुमान यांच्या प्रतिमा असलेले नाणे देण्याची तयारी केली आहे. या नाण्याची किंमत लाखो रुपयात आहे. इस्लाम स्वतः अयोध्येला जाऊन हे नाणे महंत नृत्यगोपाल दास यांच्या स्वाधीन करणार आहेत. हे नाणे विकून त्यातून येणाऱ्या रकमेतून मंदिरासाठीची पहिली वीट रचली जावी अशी त्यांची इच्छा आहे.


इस्लाम हे मजभिता गावाचे रहिवासी आहेत. गेली तीन दशके त्याचा परिवार येथे राहतो आहे. घराचे नवीन बांधकाम करण्यासठी त्यांनी २०१९ मध्ये खोदकाम सुरु केले तेव्हा त्यांना येथे दोन नाणी मिळाली होती. मात्र त्यांच्या पत्नीने त्यातील एक नाणे सोनाराला तीन लाख रुपयात विकले. हे समजल्यावर इस्लाम याना वाईट वाटले आणि पौराणिक महत्वाचे रामरायाचे दुसरे नाणे त्याच्याच कामी यावे असे त्यांनी ठरविले. त्यामुळे ते हे नाणे राममंदिरासाठी देणार आहेत.

इस्लाम सांगतात, माझ्यासाठी अल्ला आणि राम एकच आहेत. आपण स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची धर्मात वाटणी केली आहे. राममंदिर उभारणीत हिंदू मुस्लिमांचा सहयोग जगभरासाठी सौहार्दाचा संदेश देईल असा विश्वास वाटतो.

Leave a Comment